Ad will apear here
Next
दगडे यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर
हनुमंत दगडेसोलापूर : आष्टी (ता. मोहोळ) येथील नूतन विद्यालयाचे सहशिक्षक हनुमंत श्रीरंग दगडे यांना आमदार दत्तात्रय सावंत यांच्या महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा कृतिशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

या पुरस्काराचे वितरण पाच मे रोजी पंढरपूर येथे गृहराज्य मंत्री रणजीत पाटील व शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. दगडे हे मुळचे ढेकळेवाडी (बैरागवाडी) येथील असून, ते आष्टी येथील ऐलक पन्न्लाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित नूतन विद्यालयात सहशिक्षक म्हणून काम करीत आहेत. गणित हा त्यांचा मुख्य विषय आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

यापूर्वी त्यांना २०१४साली सोलापूर जिल्हा गणित संघटनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानतर्फे २०१७साली सेवाभावी शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच त्यांना मरवडे (ता. मंगळवेढा) येथील छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळातर्फे कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दगडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच ऐश्वर्या पाटील, उपसरपंच वसुदेव व्यवहारे, ढेकळेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण लोखंडे, मुख्याध्यापक सतीश कांबोज व शिक्षक कर्मचारी व स्थानिक शाळा समितीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. ‘या पुरस्कारांमुळे मला सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत अखंड कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळाली,’ अशी प्रतिक्रिया दगडे यांनी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZLDBN
Similar Posts
कृषी विज्ञान केंद्रात महिला दिन सोलापूर : राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी भूषवले
मोहोळ येथे महिला किसान दिन सोलापूर : मोहोळ कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला किसान दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती समता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मोहोळ येथे जागतिक अन्न दिन साजरा सोलापूर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि पुणे येथील स्वयं शिक्षण प्रयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी मोहोळ कृषी विज्ञान केंद्रात जागतिक अन्न दिन आणि अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मोहोळ येथे मिनी डाळ मिल उद्योग प्रशिक्षण सोलापूर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि सोलापूर येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कौशल्यविकास आधारित मिनी डाळ मिल उद्योग प्रशिक्षण आयोजित केले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language